डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

तंबाखूमुक्त शाळा माहिती


प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय,पुणे आणि
सलाम मुंबई फाऊंडेशन संचलित....

@तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान@
-----**------

*तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था ११ निकष *
   
निकष क्र.१
शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व अभ्यागत ह्यांकडून करण्यास बंदी असणे.

निकष क्र.२  
शाळेत तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करावी.आणि समितीच्या त्रैमासिक बैठका आयोजित होणे.जर वेगळ्या समितीची स्थापना करणे शक्य नसल्यास शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकांमध्ये ११ निकषांचा आढावा घेणे आणि त्याचे प्रोसिडिंग नोंदवहीत लिहून ठेवणे.

निकष क्र.३
धुम्रपान आणि तंबाखू निषिद्ध क्षेत्र – शालेय परिसरात धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे असे फलक शाळेच्या मुख्य ठिकाणी पेंट केलेला असणे

निकष क्र.४
तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती व्हावी ह्यासाठी शाळेत पोस्टर्स,घोषणापट्ट्या आणि नियम विद्यार्थ्याद्वारे तयार करून वर्गावर्गात चिकटवलेले असणे.

निकष क्र.५
तंबाखू विरोधी संदेश (घोषणा पट्ट्या ) शाळेच्या सर्व स्टेशनरी,विद्यार्थ्यांच्या वह्यांवर लिहिलेले अथवा चिकटवलेले असणे.

निकष क्र.६
मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयात तंबाखू नियंत्रण कायदा-२००३ आणि अध्यादेश ह्यांची प्रत ठेवावी .

निकष क्र.७
तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त राज्य सल्लागार प्रतिनिधी,मुंबई/प्राथमिक आरोग्य केंद्र /खाजगी दवाखाना/इंडियन डेंटिस्ट असो. चे सदस्य ह्यांची तंबाखूमुक्त शाळेसाठी पत्र लिहून मदत घेतलेली असणे.

निकष क्र.८
शाळेने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ,खाजगी दवाखाना , इंडियन डेंटिस्ट असो. चे सदस्य ह्यांपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास बोलावून शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम ,कॅन्सरची लक्षणे ह्या विषयावर एक सत्र आणि आरोग्य /मुख तपासणी असे उपक्रम आयोजित करावे.

निकष क्र.९
शाळेच्या १०० यार्ड (१२.३३मी ) परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी असणे आणि शाळेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ COPTA -2003 कायद्यानुसार फलक पेंट केलेला असणे.

       निकष क्र.१०
शाळेमध्ये जे शिक्षक ,कर्मचारी आणि विद्यार्थी तंबाखू नियंत्रणासाठी हिरिरीने कार्य करीत आहेत . त्यांचा ट्रॉफी / प्रमाणपत्र /ग्रीटींग कार्ड / पुष्प गुच्छ देऊन जाहीर सत्कार करणे.

निकष क्र.११
सर्व १० निकष पूर्ण केल्यावर शाळेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था परिसर असा फलक लावलेला असणे.


No comments:

Post a Comment