डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

सुविचार संग्रह

सुविचार म्हणजे सुंदर विचार .सुंदर विचारांनी मन आणि बुद्धीचे शुद्धीकरण होते.जीवन आनंदाने आणि उत्साहाने  जगण्याची प्रेरणा मिळते.आत्मविश्वास वाढतो.खाली काही  महत्वाच्या  मराठी,हिंदी आणि इंग्रजी सुविचारांचा संग्रह केलेला आहे.
 @ मराठी सुविचार@

१) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
२)अनुभव हा महान शिक्षक आहे,पण तो मोबदला मात्र फार घेतो.
३)आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
४)कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.
५)कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर.
६)केवळ ज्ञान असून उपयोग नाही,ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
 ७)जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
८)जो मुलांचे मन जाणतो ,तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
९)ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही,त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
१०)ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.
११)प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस.
१२)तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !
१३)प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवटांचे नंदनवन करता येतं .
१४)मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
१५)शिक्षण हे साधन आहे;साध्य नव्हे.
१६)हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
१७)खरी श्रीमंती शरीराची,बुद्धीची आणि मनाची असते.
१८)परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा .
१९)जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका;कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो        
 कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो.
२०)उठा! जागृत व्हा! जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. 
२१)तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे. 
२२) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. 
२३)माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मान-अपमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
२४)प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. 
 २५)आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. 
२६)स्वातंत्र्य म्हणजे संयम..... स्वैराचार नव्हे. 
 २७)प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका...स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 
२८) स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद. 
२९) स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक! 
30) समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही; तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. 
३१)शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे;ते जो प्राशन करेल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. 
 ३२)शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. 
३३) शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो;तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो. 
३४)शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. 
३५)शब्दांसारख शस्त्र नाही,त्यांचा वापर जपुनच करावा. 
३६)विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. 
३७) विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते. 
३८)वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. 
३९) खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे;आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. 
४०) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते....
४१)ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं. 

४२)नेहमी तत्पर रहा....बेसावध आयुष्य जगू नका. 

४३) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. 
४४) कले शिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फूल आणि प्राणा शिवाय शरीर! 

४५) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का

 ४६)आयुष्यात असं काहीतरी मिळवा;जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. 

४७) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 
 ४८)अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.  स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. 
 ४९)या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक. 
५०) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. 
५१) प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे;म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. 
५२)पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे. 
५३)पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. 
 ५४)परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ! 
५५) नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. 
५६)दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. 
५७)आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल;पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.
५८)यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
५९)उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
६०)यश आणि सुख जोडीने येतात.
६१)आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख. 
६२) अशक्य असं या जगात काहीच नाही,त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे. 
 ६३)आधी सिध्द व्हा;मग आपोआपच प्रसिध्द व्हाल. 
६४)कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. 
६५) ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. 
६६)कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात. 
 ६७)अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते;ते म्हणजे तो अपयशी का आहे याच  "कारण."  
६८)कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे. 
६९) जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा. 
 ७०)प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे. 
७१) ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या. 
७२) जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते. 
 ७३)यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते. 
७४) प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता;ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता. 
७५) यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते,यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात,
यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 
७६) ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात. 
७७)छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठ यश मिळवण्यासाठी. 
 ७८)शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे. 
७९) केवळ ज्ञान असून उपयोग नाही,ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. 
८०) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. 
८१) कष्ट इतक्या शांततेत करावे कि; यश धिंगाणा घालेल. 
८२) दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस. 
८३) वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत,कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात,पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............
 ८४)छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही.अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण;छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....! 
८५) पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण;जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हराल.
 ८६)यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. 
 ८७)नशिब हे लिफ्टसारखं असतं,तर कष्ट म्हणजे जिना आहे.लिफ्ट कधीही बंद पडू शकते;पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो... 
 ८८)आपल नशिब आपण स्वत: उजळवयाचं असत.  
८९)जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही.प्रयत्नांशी परमेश्वर....! 
९०)यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो. ९१) काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे;पण प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल... 
 ९२)परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते,तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. 
 ९३)ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं. 
९४) जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल. 
९४) ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. 
 ९५)सेवा जग फुलविते पण प्रीति मन फुलविते. 

 ९६)सौंदर्य हे वस्तूत नसते,पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 

 ९७)वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या

तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती.
शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते.
तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती. 

९८) हृदयासारख सोपे नाही काही या जगात तोडायला.

९९)मनाला गरज नसते पंखांची, स्वप्नांच्या आकाशी ऊडायला. 

 १००)जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..ती गोष्ट देवाकडे मागण्यात काहीच अर्थ नसतो.. 

 १०१)अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते. 

१०२) काळ फक्त माणसाचं वय वाढवतो;आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो .

 १०३)आपल्यामुळे कुणाचं तरी अडतं’ ...हि भावना सुखावणारी असते .

 १०४)माणसं केलेले उपकार विसरून जातात ;मात्र हवेत विरून जाणारे शब्द लक्षात ठेवतात. 

 १०५)खोलवर दुखावलेली माणसे एकतर पूर्णपणे कोलमडून जातात

आणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात कि; नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही माणसे सुद्धा भावनाप्रधान होती." 

 १०६)समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो,जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही.

१०७) वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते. 

 १०८)स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा,इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा... 

 १०९)कधी हसवतात, कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,

पानांसारखे पडत असतात,काही माणसे असतात खास जी मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जीवनात तरीही कायम साथ देत राहतात. 

 ११०)शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,अश्रूंची गरज भासलीचं नसती,सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर भावनाची किंमतच उरली नसती.. 

 १११)कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो.

११२)काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही. 

 समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. 

 ११३)सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. 

 ११४)शास्त्र हे असे शस्त्र आहे की,याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे. 

 ११५)शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते. 

 ११६)रोगाच्या भयाने जितके लोक मरतात तितके लोक रोगाने मरत नाहीत. 

 ११७)माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी. 

११८) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. 
 ११९)निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात. 

 १२०)दुःखातील दुःखीताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.  दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका.वाटू शकलात तर आपला आनंद वाटा,दु:ख कवटाळत बसू नका.ते विसरा आणि सदैव हसत रहा. 

१२१) दया अशी भाषा आहे की ती बाहिर्‍यालाही ऐकायला येते

आणि मुक्याला देखील समजू शकते. 

No comments:

Post a Comment